नवी दिल्ली – आगामी निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय टीडीपीचे सर्वेसर्वा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी घेतला आहे. टीडीपी आणि काँग्रेस भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी एकत्र आले असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तेलंगणच्या जागांसाठी टीडीपी आणि काँग्रेस यांच्यात समझौताही झाला असल्याची माहिती आहे. एकूण ११९ जागांपैकी १४ जागा तेलगू देशमला देण्यास काँग्रेस तयार असून ९५ जागांवर काँग्रेस निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.तसेच लोकसभा निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष एकत्रित येणार आहेत.
दरम्यान चंद्राबाबू नायडू यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची आज दिल्लीत बैठक झाली. त्या बैठकीच्या वेळी भाजपच्या विरोधात एकत्रित येण्याचा निर्णय या तीन पक्षाच्या नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक भाजपला जडणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS