हैदराबाद – तेलगू देशम पक्षाचे सर्वेसर्वा आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रातील पक्षाच्या दोन मंत्र्यांना तातडीने राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. अशोक गजपती राजू आणि वाय एस चौधरी असे तेलगू देशम पक्षाचे केंद्रात दोन मंत्री आहेत. त्यांना तातडीने राजीनामा देण्याचं फर्मान पक्षातर्फे काढण्यात आलं आहे. त्यानुसार हे दोन्ही मंत्री राजीनामा देणार आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचं आश्वासनं केंद्र सरकारने पाळलं नाही त्यामुळे आम्ही सरकारमध्ये राहू इच्छीत नाही असं चंद्रबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी आपण पंतप्रधांनशी बोलण्याचा प्रय़त्न केला, मात्र त्यांच्यापर्यंत पोहचला आलं नाही असंही चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले आहे.
आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा अशी मागणी तेलगू देशमने केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ही मागणी लावून धरली होती. संसदेच्या चालू अधिवेशनातही त्यांच्या खासदारांनी ही मागणी लावून धरली होती. आजही पीएनबी घोटाळा आणि आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा या दोन मुद्यावरुन लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे दिवसभरासाठी कामकाज तहकूब करावं लागलं. त्यानंतर लगेच चंद्रबाबू नायडू यांनी पत्रकार परिषद घेऊन तेलगू देशमच्या मंत्री राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आंदोलनकर्त्यां तेलगू देशम खासदारांची काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी भेट घेतल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने दिले आहे. 2019 मध्ये काँग्रेसचे सरकार केंद्रात आले तर आम्ही आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देऊ असं राहूल गांधी यांनी आश्वासन दिलं आहे.
Andhra Pradesh CM Chandrababu Naidu directs TDP ministers Ashok Gajapathi Raju and YS Chowdary to resign as Union Ministers. pic.twitter.com/nDbnNnXnXV
— ANI (@ANI) March 7, 2018
COMMENTS