कोल्हापूर- आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दावा केला होता कि ते चहा विकत होते. त्यांनी चहा विकला कि नाही ते माहिती नाही परंतु आता ते देश नक्कीच विकत आहेत, अशी टीका जेएनयु विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने केलीय.
भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने आज कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला सुरुवात होण्याआधी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कन्हैया कुमारच्या विरोधात नाट्यगृहाबाहेर जोरदार निदर्शने केली. त्याला प्रतिउत्तर म्हणून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या. दरम्यान पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
COMMENTS