मुंबई – बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघानं दिला आहे. शिक्षणमंत्री आणि सरकारविरोधात ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचे आझाद मैदानात जेलभरो आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी हा इशारा दिला आहे. बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, याला सर्वस्वी शिक्षणमंत्री जबाबदार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे.
दरम्यान चार वेळा शिक्षकांनी आंदोलन केलं मात्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांनी मागण्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. तसेच शिक्षणमंत्र्यांनी मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी केली नाही. राज्यात 72 हजार शिक्षक 16 लाख विद्यार्थी असून कायम विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान देण्याबाबत जीआर काढूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. तसेच २०१२ सालापासून शिक्षकांना नियुक्ती व मान्यता देण्याची शिक्षक संघटनेची मागणी असून ही मागणी मान्य झाली नाही तर जोरदार आंदोलनाचा इशाराही शिक्षक संघटनेनं दिला आहे.
COMMENTS