“शिक्षकांचे मुल्यमापन करुन पगार ठरवणारे तावडे फेल होऊनही मंत्री कसे ?”

“शिक्षकांचे मुल्यमापन करुन पगार ठरवणारे तावडे फेल होऊनही मंत्री कसे ?”

मुंबई – मुंबई विद्यापीठाचा अजूनही निकाल लागलेला नाही. 11 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका गहाळ झाल्या आहेत. ऑनलाईन पेपर तसापणीत पूर्णपणे गोंधळ झालेला आहे. तरीही कुलगुरू संजय देशमुख यांना वाचवण्याचा प्रयत्न होता. मात्र अहवाल आल्यामुळे नाईलाजाने त्यांची गच्छंती केली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. 
मुंबई विद्यापीठाचे कुलपती असेल तरी अप्रत्यक्षपणे या विद्यापीठावर उच्च शिक्षण विभागाचे नियंत्रण आहे. त्यामुळे या खात्याचे मंत्री विनोद तावडे आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. तावडे नेहमी म्हणत असतात शिक्षकांचे मुल्यमापन करुन त्यांना पगार द्यायला हवा, मग तोच निकष तावडेंना लावला तर तावडेंची मंत्री होण्याची पात्रता होणार नाही तरी ते मंत्री कसे असा सवालही मलिक यांनी केला आहे. विनोद तावडे यांना मंत्रीपदावरुन तातडीने बडतर्फ करावे अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

COMMENTS