मुंबई – शिक्षक मतदार संघ निवडणुकीतही शिवसेनेनं स्वबळाचा नारा दिला असून मुंबई शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. या मतदारसंघातील निवडणुकीसाठी शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या घोषणेआधीच शिवसेनेनं उमेदवाराची घोषणा केली असून पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना स्वबळावर उतरली आहे.
दरम्यान शिवाजी शेंडगे हे चारकोप येथील एकविरा विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये गेली 18 वर्षे कार्यरत असून 2015 मध्ये शेंडगे यांच्या पॅनलने माध्यमिक शिक्षक कर्मचारी पगारदार पतसंस्था निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी त्यांनी आपला पॅनल विजयी केला होता. यावेळी त्यांनी शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील यांच्या पॅनलचा पराभव केला होता.
COMMENTS