मुंबई – राज्यातील काँग्रेस नेत्यांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये अच्छे दिन आले असल्याचं दिसत आहे. कारण राज्यातील अनेक नेत्यांना राहुल गांधी यांनी पक्षात महत्त्वाची संधी दिली आहेत. खासदार राजीव सातव यांच्याकडे गुजरात आणि दीव, दमण या राज्यांचे प्रभारी पद दिले असून माजी मंत्री नितीन राऊत यांची अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. यापाठोपाठ अमरावती जिल्हय़ातील तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर कर्नाटक या निवडणूक होत असलेल्या राज्याची सहप्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान राऊत आणि यशोमती ठाकूर या विदर्भातील दोन नेत्यांना नव्या रचनेत संधी मिळाली असून माजी केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे हे तीन नेते अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत. तसेच माजी राज्यमंत्री अमित देशमुख, माजी मंत्री वर्षां गायकवाड, खासदार राजीव सातव, माजी खासदार प्रिया दत्त, आमदार हर्षवर्धन सकपाळ आणि आमदार यशोमती ठाकूर हे पक्षाचे सचिव आहेत. यावरुन राहुल गांधी यांच्या टीममध्ये राज्यातील जवळपास अनेक नेत्यांना चांगली संधी दिली गेली आहे. त्यामुळे या नेत्यांचे टीम राहुलमध्ये अच्छे दिन आले असल्याचं दिसत आहे.
COMMENTS