रायगड – भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती व सुशासन दिनानिमित्त भाजपा रायगड आयोजित ‘शेतकरी संवाद अभियान’ कार्यक्रमात शहाबाज येथे भाजपचे नेते पंकजा मुंडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. आज पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत ९ कोटी शेतकरी कुटुंबाला १८००० करोड रुपयांचे हस्तांतरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होत आहे. दरम्यान, पकंजा मुंडे यांनी ट्विट करून त्या क्षणी माझ्या डोळ्यातून आश्रू तरळले, असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहा राज्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॅन्फरन्सद्वारे संवाद साधला. तसेच ९ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी अंतर्गत १८००० कोटींचा निधी हस्तांतरीत केला. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाच्या आठवण ट्विटरवर शेअर केली.
त्यांनी म्हटले आहे की, माझा देशातील शेतकरी विकासीत होत आहे. ९ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीतून १८००० कोटी निधी देण्यात आला जेव्हा स्किनवर आकडे स्क्रोल होत होते. तेव्हा मला अभिमान वाट होता, आणि माझ्या डोळ्यातून आश्रू तरळले होते
When numbers were scrolling on the screen I was feeling so proud that I had tears in my eyes my country farmers are evolving and 9 thousand cr family getting 18 thousand cr rupees transfered in just a moment…@narendramodi pic.twitter.com/UEb15AUdD3
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 25, 2020
COMMENTS