साखरपुड्यादरम्यान तेज प्रताप यादव झाले भावूक, लालू प्रसादांच्या आठवणीत म्हणाले ‘मिस यू पापा’ !

साखरपुड्यादरम्यान तेज प्रताप यादव झाले भावूक, लालू प्रसादांच्या आठवणीत म्हणाले ‘मिस यू पापा’ !

नवी दिल्ली – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव यांचा साखरपुडा पार पडला आहे. यावेळी तेज प्रताव यादव यांनी लालू प्रसाद यादव यांची आठवण काढली आहे. त्यावेळी त्यांनी मिस यू पापा असं ट्वीट केलं आहे. तेज प्रताप यादव यांच्या पत्निचं नाव ऐश्वर्या राय असून त्या छपरा जिल्ह्यातील परसा विधानसभा मतदारसंघातील आरजेडीच्या आमदार आणि माजी मंत्री चंद्रिका प्रसाद राय यांची मोठी मुलगी आहे. लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच ते आजारी असल्यामुळे तेज प्रताप यादव यांच्या साखरपुड्याला उपस्थित राहु शकले नाहीत. त्यामुळे तेज प्रताप यादव यांनी त्यांची आठवण काढत ते भावूक झाले असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान तेज प्रताप यांच्या ट्वीटनंतर त्यांच्या समर्थकांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत आकाश कुमार यांनी ”वो हमारे दिल में बसते हैं…उदास या हताश होने की ज़रूरत नहीं है बड़े भाई…” असं ट्वीट केलं आहे. तसेच पप्पू यादव यांनी ”उदास ना हों भइया समय-समय की बात है, पूरा बिहार आपके साथ है.” असं ट्वीट केलं आहे.

 

COMMENTS