बंगळुरू – कोट्यवधी रुपयांच्या बनावट मुद्रांक पेपर घोटाळ्यातील दोषी अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. बंगळुरूमध्ये उपचार घेत असताना तेलगीचा मृत्यू झाला आहे. बंगळुरुच्या व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये रात्री साडेआठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचं इंडिया टुडेने म्हटले आहे. इंडिया डॉटकॉमनेही अशा प्रकारची बातमी दिली आहे. दरम्यान एनआयनं दिलेल्या वृत्तानुसार तेलगीची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे.
COMMENTS