आंध्र प्रदेश – भाजपवर नाराज असलेला मित्रपक्ष तेलगू देसम अखेर एनडीएतून बाहेर पडला आहे. चंद्रबाबू नायडू यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. आंध्रप्रदेशला विशेष दर्जा देण्याबाबत टीडीपी आणि काँग्रेसकडून जोरदार मगणी केली होती. भाजपनं या मागणीके दुर्लक्ष केल्यामुळे टीडीपीने अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेताच यापूर्वी केंद्रातील टीडीपीच्या दोन मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता.
दरम्यान टीडीपीच्या खासदारांची संख्या 16 असून टीडीपीने पाठिंबा काढल्यामुळे सध्या भाजप खासदारांची संख्या २७३ म्हणजेच काठावर पास एवढी आहे. गेली अनेक दिवसांपासूनं आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्याची मागणी टीडीपीकडून केंद्र सरकारकडे केली जात होती. परंतु भाजप आंध्र प्रदेशला विशेष दर्जा द्यायला तयार नव्हतं. या मुद्द्यावरुन तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू नाराज झाले होते. त्यामुळे त्यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर काही दिवसांपूर्वीच टीडीपीचे केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू आणि वाय एस चौधरी यांनी राजीनामा दिला होता.
COMMENTS