टेंभूर्णी – लातूर मार्गासाठी एकवटले ३ जिल्ह्यातील आमदार !

टेंभूर्णी – लातूर मार्गासाठी एकवटले ३ जिल्ह्यातील आमदार !

सोलापूर –उस्मानाबाद- लातूर जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेला टेंभूर्णी-कुर्डूवाडी-बार्शी-लातूर रोडसाठी या तिन्ही जिल्ह्यातील आमदार एकवटले आहेत.  याविषयी चालू अधिवेशनात माढ्याचे आमदार बबन शिंदे ,बार्शीचे आमदार दिलीप सोपल, उस्मानाबाद-कळंबचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबकराव भिसे, लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी लक्षवेधी सूचना मांडली. टेभूर्णी-लातूर हा १४५ राज्यामहामार्ग क्रमांक असून या रोडवरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतून होते. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. शासनाने रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली असली तरी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. त्यामुळे या रस्यावर मोठ्या प्रमाणात होत असलेली अपघात ,नागरिकांचा पसरलेले असंतोष यामुळे या रोडची तातडीने विशेष दुरुस्ती करण्याची मागणी अधिवेशनात लक्षवेधीतून करण्यात आली. बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

हा महामार्ग चार पदरीसाठी आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. त्याचं कामही लवकरता लवकर सुरू करु अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. मात्र अजून त्यांचे काम सुरू झाले नाही. त्यामुळे चौपदीरकरणाचे काम सुरू होईपर्यंत या मार्गावरील दुरुस्तीचे काम सरकारने करावे अशी मागणी तीन जिल्ह्यातील आमदारांनी केली आहे. त्यावर या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

COMMENTS