केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांचावर निशाना साधल आहे. ‘सिद्धरामय्या यांनी उद्या दहशतवादी अजमल आमिर कसाबची जयंती कर्नाटकात साजरी केली तरीही आश्चर्य वाटणार नाही.’ अशी जोरदार टीका हेगडे यांनी केली आहे.
कित्तूरची राणी चिन्नम्माबाबत एखादा महोत्सव सुरु करावा किंवा त्यांची जयंती साजरी करावी अशी इच्छाशक्ती सिद्धरामय्या दाखवत नाहीत. कारण ते टिपू सुलतानसारख्या खुनी माणसाची जयंती साजरी करण्यात धन्यता मानतात, असेही हेगडे यांनी बेळगाव येथे झालेल्या एका जनसभेत आरोप केला आहे. अनंतकुमार हेगडे यांनी याआधी टिपू सुलतानच्या जयंतीवरूनही सिद्धरामय्यांवर टीका केली होती.
कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आहे. त्यांना देशभक्तांची जाण नाही असाही आरोप हेगडे यांनी केला. टिपू सुलतान हिंदू विरोधी होता म्हणूनच त्याची जयंती कर्नाटकात साजरी केली जाते. असेही हेगडे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे.
बंगळुरूमध्ये 9 लाख बांगलादेशी लोकांना आश्रय देण्यात आला आहे. तुम्ही तुमच्या पायाखालची जमीन तपासून पाहा तिथेही बॉम्ब लावला असेल तर माहित नाही. इतकी अस्थिरता कर्नाटकमध्ये निर्माण झाली आहे असेही हेगडे यांनी म्हटले.
Karnataka has become a safe haven for criminals, there 9 lakh Bangladeshis in Bangalore, you'll find immigrants in Belgaum, Bijapur, Hubli, Dharwad & even in Kittur you'll find them. Check under your legs, bombs could have been planted: Anantkumar Hegde pic.twitter.com/WFvBEux0iO
— ANI (@ANI) November 18, 2017
Siddaramaiah celebrated Tipu Jayanti, it is a matter of time before he starts making you celebrate Kasab (Ajmal Kasab) Jayanti: Union Minister Anantkumar Hegde in Belgavi (17.11.2017) pic.twitter.com/TBY4VQUmox
— ANI (@ANI) November 18, 2017
COMMENTS