मुंबई – महाविकास आघाडी सरकारचा 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या विस्तारासाठी सरकारकडून जोरदार तयारी सुरु आहे. परंतु यापूर्वीच राजभवनकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचना आल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणारा शपथविधी दुपारी दोनच्या आत उरकण्याची सूचना सरकारला देण्यात आली आहे.मंत्रिमंडळ विस्ताराबाबतचे पत्र सरकारकडून राजभवनला पाठवण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला शपथविधीबाबत सूचना मिळाल्या आहेत. यामध्ये शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत उरकून घेण्याची सूचना दिली आहे.
दरम्यान सरकारने मंत्रिमंडळ शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागितली आहे. राज्यपालांच्या सूचनेनंतर त्याला उत्तर दिले जाईल. सरकार जी वेळ मागते तीच वेळ दिली जाते. मात्र, आता जर दुपारी एकची वेळ घेतली आहे आणि राजभवनाकडून दुपारी 2 पर्यंत शपथविधी उरकण्यास सांगितलं असताना सरकारकडे फक्त एकच तास असेल. या एका तासात 30 जणांचा शपथविधी कसा करायचा अशी अडचण ठाकरे सरकारसमोर आहे. त्यामुळे आता राजभवनकडून वेळ वाढवून दिली जाणार का हे पाहण गरजेचं आहे.
COMMENTS