ठाणे पालिकेला ‘ब्लॅकमेलर’ भाजप कार्यकर्त्यांचा विळखा !

ठाणे पालिकेला ‘ब्लॅकमेलर’ भाजप कार्यकर्त्यांचा विळखा !

मुंबई – ठाणे महापालिकेला ‘ब्लॅकमेलर’ भाजप कार्यकर्त्यांचा विळखा असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. आरटीआयच्या माध्यमातून खंडणी गोळा करणाऱ्या भाजप कार्यकर्ता सुधीर बर्गे पाठोपाठ माजी भाजप नगरसेवक राजकुमार यादव याला अटक करण्यात आली आहे. आरटीआयचा वापर करून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.

दरम्यान राजकुमार हा आरटीआयमधून माहिती गोळा करुन समोरच्या पार्टीला खंडणीसाठी धमकी द्यायचा. याबाबत त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेनं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं आहे. राजकुमार यादव याची आई सध्या भाजपच्या तिकिटावर इंदिरानगर प्रभागातून निवडून आल्या आहेत. तर वडीलही समाजवादी पार्टीमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

COMMENTS