शिवसेनेच्या ‘या’ आमदारानं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप !

शिवसेनेच्या ‘या’ आमदारानं मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप !

ठाणे – लोकसभेसाठी घेण्यात येणाय्र चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. वसई-विरारचे महापौर रुपेश जाधव यांनी हा आरोप केला असून त्यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी या गाडीची झडती घेतली. यावेळी गाडीत दोन पाकिटांत 50 ते 60 हजार रुपये सापडले. त्यामुळे याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान शिवसेनेने आचारसंहिता भंग केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी केला आहे. त्यानंतर बहुजन विकास आघाडी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आले. महापौर रुपेश जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटत असल्याच्या संशयावरून आमदार फाटक यांच्या गाडीला गराडा घातला आणि गाडी पोलिसांच्या ताब्यात दिली.त्यानंतर पोलीस आता अधिक तपास करत असून गाडीत हे पैसे कोठून आले आणि आमदार रवींद्र फाटक हे खरच पैसे वाटत होते का  तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS