ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेची निवडणुक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा एक उमेदवार बिनविरोध निवडूण आला आहे. भिवंडी तालुक्यातील खोणी जिल्हा परिषद गटातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख या बिनविरोध निवडूण आल्या आहेत. या बाबातचा अधिकृत निर्णय 14 डिसेंबररोजी जाहिर केला जाणार आहे.
ठाणे जिल्हा परिषेदेसाठी येत्या 14 डिसेंबरला मतदान होत आहे. जिल्हा परिषद गटात बिनविरोध उमेदवार निवडून यावा यासाठी काँग्रेसचे स्थानिक उमेदवार प्रयत्नशील होते. या गटासाठी भाजपा व शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता. तर राकाँपाने काँग्रेसला पाठिंबा जाहिर केला होता. तसेच या गटात समाजवादी पक्षाने उमेदवारी करण्याची तयारी केली होती. परंतू त्यानंतर भाजपा विरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र येत काँग्रेसच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
COMMENTS