ठाणे – ठाणे जिल्हा परिषदेच्या काल झालेल्या मतमोजणीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालं. शिवसेना एकट्याच्या बळवार सत्तेवर येऊ शकली नाहीत. 53 सदस्य संख्या असलेल्या शिवसेनेला एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करण्यासाठी 27 जागांची गरज होती. शिवसेनेला 26 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे स्वबळावर बहुमत मिळवण्यासाठी फक्त एका जागेची गरज होती. भाजप पुरस्कृत नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अशोक घरत यांनी आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेनं ठाणे झेडपीत बहुमताची मॅजिक फिगर गाठली आहे.
भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत छुपी युती केली होती. निकाल लागल्यानंतरही शिवसेनेनं राष्ट्रवादीला सत्तेत बरोबर घेणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे ग्रामिण जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे जरी शिवसेनेनं बहुमताची मॅजिक फिगर गाठली असली तरी ते राष्ट्रवादीसोबत एकत्र सत्तेमध्ये राहण्याचीच शक्यता जास्त आहे.
COMMENTS