मुंबई – काॅंग्रेस आघाडीने आणलेल्या योजनांची नावे मागील पाच ते दहा वर्षात बदलण्याचा धडका भाजप सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने लावला होता. अनेक योजनांना संघ आणि भाजपच्या नेत्यांची नावे देण्यात आली. तसेच अनेक योजनांना भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार पटेलांचे नाव लावण्यात आले. पण ज्या सरदार पटेलांच्या नावाने राजकारण करणाऱ्या याच भाजप सरकारने आता जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवरील सरदार पटेल यांचे नाव काढून त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आहे दिले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मैदानाचे नाव बदलण्यात आले आहे. हे मैदान मोटेरा स्टेडियम म्हणून ओळखले जाते होते. त्यानंतर त्याची पुन्हा बांधणी करण्यात आली आणि सरदार पटेल असे नाव करण्यात आले होते. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातील डे-नाइट कसोटी सामन्याआधी या स्टेडियमचे नाव पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे.गुजरात क्रिकेट असोसिएशनद्वारे बांधण्यात आलेले हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. याआधी प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार करता ऑस्ट्रेलियातील मेलबर्न मैदान सर्वात मोठे होते. त्याची क्षमता १ लाख इतकी आहे. हे मैदान आता नरेंद्र मोदी स्टेडियम या नावाने ओळखले जाणार आहे.
COMMENTS