नवी दिल्ली – आमचा पगार प्राथमिक शाळेतील शिक्षकापेक्षाही कमी असून अशा परिस्थितीत मग चोरी तर करावीच लागेल असं वाजग्रस्त वक्तव्य भाजपा खासदार हरीश द्विवेदी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. उत्तर प्रदेशमधील बस्ती येथील खासदार हरीश द्विवेदी नुकतेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलत असचाना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
दरम्यान एका खासदाराला १२ कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. पण खासदाराचे वेतन हे प्राथमिक शाळेतील शिक्षकापेक्षाही कमी आहे. अशा परिस्थितीत त्याला चोरी करावी लागेलच, सद्यस्थितीत खासदारांना पुरेसा पगार नाही. जे वेतन मिळते त्यातून खासदार, मंत्री त्याचा मतदार संघ चालवू शकत नाही. पैसे कमावण्यासाठी त्याला अन्य मार्गांचा वापर करावा लागतो असं त्यांनी म्हटलं आहे.
COMMENTS