लोकसभा निवडणुकीच्या तिसय्रा टप्प्यात ‘या’ चौदा जागांसाठी उद्या मतदान, ‘या’ मतदारसंघात चुरशीची लढत!

लोकसभा निवडणुकीच्या तिसय्रा टप्प्यात ‘या’ चौदा जागांसाठी उद्या मतदान, ‘या’ मतदारसंघात चुरशीची लढत!

मुंबई – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या पार पडणार आहे. 14 जागांसाठी हे मतदान घेण्यात येणार असून या सर्व 14 जागांवर चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहे. मतदानाच्या तिसय्रा टप्प्यात महाराष्ट्रात बारामती, जालना, माढा, अहमदनगर, कोल्हापूर, हातकणंगले, औरंगाबाद, सांगली, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी-सिंधूदुर्ग, जळगाव आणि रावेर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

या मतदारसंघात चुरशीची लढत

पुणे – पुण्यात भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी असा सामना रंगला आहे. या मतदारसंघात मागील निवणुकीत भाजपचे अनिल शिरोळे विजयी झाले होते. शिरोळे यांना 5 लाख 69 हजार 825 मतं पडली होती तर काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांना 2 लाख 54 हजार 56 मतं पडली होती.

माढा – या मतदारसंघात भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर तर राष्ट्रवादीकडून संजय शिंदे हे मैदानात आहेत. मागील निवडणूकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील अटीतटीच्या लढतीत 25 हजार 344 मतांनी विजयी झाले होते. मोहिते पाटलांना 4 लाख 89 हजार 989 मतं पडली होती तर भाजपच्या पाठिंब्यावर लढणाऱ्या स्वाभिमानी पक्षाच्या सदाभाऊ खोत यांना 4 लाख 64 हजार 645 मतं पडली होती.

बारामती – या मतदारसंघात भाजकडून कांचन कूल तर राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे या मैदानात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना ५ लाख 21 हजार 512 मतं पडली होती तर महायुतीतल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मतं पडली होती. सुप्रिया सुळे 69 हजार 719 मतांनी विजयी झाल्या होत्या.

औरंगाबाद – या मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे तर काँग्रेसडून सुभाष झांबड हे मैदानात आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना 5 लाख 20 हजार 902 मतं पडली होती तर काँग्रेसच्या नितीन पाटील यांना 3 लाख 58 हजार 902 मतं पडली होती. खैरे 1 लाख 62 हजार मतांनी जिंकले होते.

सांगली – या मतदारसंघात भाजपकडून संजयकाका पाटील तर स्वाभिमानीकडून विशाल पाटील हे मैदानात आहेत. मागील निवडणुकीत भाजपने संजयकाका पाटील यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी संजयकाका तब्बल 2 लाख 39 हजार 292 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 6 लाख 11 हजार 563 मतं पडली होती. तर काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील यांना 3 लाख 72 हजार 271 मतं पडली होती. यावेळेसची निवडणूक चुरशीची होणार असून वंचित बहूजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर हे मैदानात आहेत.

सातारा – या मतदारसंघात भाजपकडून नरेंद्र पाटील तर राष्ट्रवादीकडून  उदयनराजे भोसले हे मैदानात आहेत. मागील निवडणुकीत उदयनराजे हे 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. त्यांना 5 लाख 22 हजार 531 मतं पडली होती तर अपक्ष पुरुषोत्तम जाधव यांना 1 लाख 55 हजार 937 मतं पडली होती.

जालना – या मतदारसंघात भाजपकडून रावसाहेब दानवे हे मैदानात आहेत. तर राष्ट्रवादीकडून विद्ृमान खासदार उदयनराजे भोसले हे मैदानात आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे आत्ताचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना 5 लाख 91 हजार 428 मतं पडली होती तर काँग्रेसच्या विलास औताडे यांना 3 लाख 84 हजार 630 मतं पडली होती. रावसाहेब दानवे 2 लाख 6 हजार 798 मतांनी विजयी झाले होते.

अहमदनगर – या मतदारसंघात भाजपकडून सुजय विखे तर राष्टेरवादीकडून संग्राम जगताप हे मैदानात आहेत. मागील निवडणुकीत भाजपच्या दिलीप गांधी यांना 6 लाख 5 हजार 185 मतं तर राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या राजीव राजळे यांना 3 लाख 96 हजार 63 मतं पडली होती. गांधी 2 लाख 9 हजार 122 मतांनी विजयी झाले होते.

कोल्हापूर – या मतदारसंघात शिवसेनेकडून संजय मंडलिक तर राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक मैदानात आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांना 6 लाख 7 हजार 665 मतं पडली होती, तर शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना 5 लाख 74 हजार 406 मतं पडली होती. महाडिक 33 हजार 259 मतांनी विजयी झाले होते.

हातकणंगले –  या मतदारसंघात शिवसेनेकडून धैर्यशील माने तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून
राजू शेट्टी हे मैदानात आहेत. मागील निवडणुकीत महायुतीच्या पाठिंब्यावर लढणारे राजू शेट्टी 1 लाख 77 हजार 810 मतांनी विजयी झाले होते, त्यांना 6 लाख 40 हजार 428 तर काँगेसच्या कलाप्पा आवाडे यांना 4 लाख 62 हजार 616 मतं पडली होती.

COMMENTS