‘‘खाटेचे’ कुरकुरणे समजून घ्या”, ‘सामना’च्या अग्रलेखाला बाळासाहेब थोरातांचं उत्तर !

‘‘खाटेचे’ कुरकुरणे समजून घ्या”, ‘सामना’च्या अग्रलेखाला बाळासाहेब थोरातांचं उत्तर !

मुंबई – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘सामना’च्या अग्रलेखाला उत्तर दिले आहे.खाटेचे कुरकुरणे समजून घ्या, ‘सामना’चा अग्रलेख हा अपूर्ण माहितीवर आधारित आहे. ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र असल्याने त्यांनी नीट माहिती घेऊन लिहावे, हे अपेक्षित आहे. कोणत्याही बदल्यांची आमची मागणी नाही. ‘खाटेचे’ कुरकुरणे ऐकून घ्यावे. आम्ही म्हणणे मांडल्यावर ‘सामना’त पुन्हा एकदा अग्रलेख लिहिला जावा. कारण यातून चुकीचा मेसेज जात असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान 56-54-44 याप्रमाणे मंत्रिमंडळ वाटप झालं आहे. हा काही वादाचा विषय नाही. मात्र राज्याच्या हितासाठी काही मुद्दे मांडायचे आहेत. आम्ही भक्कमपणे महाविकास आघाडीत आहोत. परंतु व्यथा असली तर सांगितली पाहिजे,
राज्याच्या मुद्यांवर आम्हाला भेटायचे आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमचं म्हणणं समजून घ्यावं, असं थोरात यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांना भेटत नाहीत, हे चुकीचं आहे. एक दोन दिवसात भेटीची वेळ मिळेल. आम्हाला मुख्यमंत्र्यांना समोरासमोर भेटायचं आहे. आमचे प्रश्न हे जनतेशी निगडित आहेत असंही थोरात यांनी म्हटलं आहे.

COMMENTS