अहमदनगर – अहमदनगरमधील राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून थोरात आणि विखे-पाटील यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. दोघेही काॅंग्रेसमध्ये असतानाही दोघांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही बंधने होती. मात्र, विखे-पाटील भाजपमध्ये गेल्याने थोरात गट आणखी आक्रमक झाला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये असलेले अनेक नेते काॅंग्रेसचे नेते बाळासाहेब विखे-पाटील यांच्या पाठिशी उभे राहिले. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या आघाडीने मिळवलेले वर्चस्व पाहता बँक थोरात गटाच्या ताब्यात आल्याचे मानले जाते. भाजपचे नेते, माजी मंत्री राधाकृष्ण विखे गटाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे.
अहमदनगर बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले होते, त्यासाठी बैठका घेतल्या होत्या. निवडणूक जरी जिल्हा बँकेचे असली तरी गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्याच्या शल्याचे आणि पराभवाचे वचपे बँकेच्या निवडणुकीत काढले गेल्याने निवडणूक रंगतदार झाली.
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्ह्य़ातील भाजप नेत्यांची मोट बांधून ती थोरात-राष्ट्रवादी यांच्या विरोधात उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी फडणवीस यांच्यामार्फत या सर्वांना एकत्र करण्याचे प्रयत्न केले. मात्र पराभवाचा झटका बसलेले भाजपचे नेते आता सावध झाले होती. कर्डिले, कोल्हे, राजळे, पिचड हे थोरात यांच्या संपर्कात राहिले. यातून थोरात व राष्ट्रवादीला विखे यांची कोंडी करण्यासाठी बळच मिळाले. त्याचा परिणाम बिनविरोध झालेल्या बहुसंख्य जागांवर थोरात-राष्ट्रवादी यांचे वर्चस्व निर्माण होण्यात झाले. बिनविरोध जागांमध्ये राष्ट्रवादी समर्थक आठ, काँग्रेस किंवा थोरात समर्थक पाच तर विखे समर्थक दोन आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे अखेरच्या वेळी विखे यांची संगत सोडून थोरातां मिळाले. सेवा संस्थेच्या नगर, पारनेर, कर्जत यासह बिगर शेती मतदारसंघातील निवडणुकीचे मतदान अद्याप बाकी आहे.
COMMENTS