राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अज्ञाताकडून फोनवरुन धमकी !

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अज्ञाताकडून फोनवरुन धमकी !

मुंबई  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नवाब मलिक यांना अज्ञात व्यक्तीने फोनवरुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबतचं ट्वीट मलिक यांनी केलं असून  एका खासगी वाहिनीवर चर्चात्मक कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला धमकी दिल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच याबाबत आपल्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी मलिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दरम्यान याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली असल्याचंही मलिक यांनी म्हटलं आहे. या धमकीनंतर राष्ट्रवादीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्यांना तात्काळ पोलीस संरक्षण पुरविण्याची मागणी केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत असून या तपासानंतरच मलिक यांना नेमकं धमकी कोणी दिली आहे. याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS