औरंगाबाद – मी एका भाजप आमदाराचा खुन करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. थांबवू शकत असाल तर मला थांबवा’ असं ओपन चॅलेंज एका तरुणानं केलं आहे. संभाजीराजे भोसले असं या युवकाचं नाव असून त्याने या आशयाची पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याने भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना ही धमकी दिली गेली असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान या पोस्टच्या विरोधात रविवारी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपायुक्तांची भेट घेत धमकी देणाऱ्यास अटक करण्याची मागणी केली आहे. शहरात असणा-या युवराज छत्रपती संभाजीराजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक म्हणून संभाजीराजे भोसले त्याने शनिवारी (ता. 23) रात्री उशीरा त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करून भाजप आमदाराचा खुन करणार असल्याचे सांगितले. फडणवीस सरकार फक्त ब्राम्हणांना संरक्षण देत असल्याचा आरोप या तरुणांने केला आहे. या धमकीची माहिती सर्वत्र पसरताच भाजपचे तालुका अध्यक्ष गणेश नावंदर, प्रदेश प्रवक्ते शिरिष बोराळकर, मंगलमंत्री शास्त्री, विजय शिंदे यांनी रविवारी पोलिस उपायुक्त दिपाली घाटे-घाडगे यांना निवेदन देत आरोपीस अटक करा आणि तडीपार करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलीस याबाबत तपास करत असून तपासनानंतरच खरी माहिती समोर येणार आहे.
COMMENTS