मुंबई – तीन राज्यांमध्ये घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये ही निवडणूक घेण्यात आली होती. शनिवारी सकाळपासून या तिन्ही राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपनं चांगलीच टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका पाहता या निवडणुकीसाठी भाजपनं अस्तित्व पणाला लावलं होतं. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं असून शनिवारी पार पडणा-या मतमोजणीची बित्तंबातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत. या मतमोजणीला सुरुवात होईपर्यंत आपल्यासमोर काही एक्झीट पोल समोर आले आहेत.
या एक्झीट पोलमध्येही भाजपलाच कौल दिला असल्याचं पहावयास मिळत आहेत. तोपर्यंत एक नजर टाकूयात एक्झीट पोलवर….
विविध एक्झीट पोलचे अंदाज
त्रिपुरा – एकूण जागा – 60
अक्सीस, माय इंडिया आणि न्यूज 24 चा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 45 ते 50
डावे पक्ष – 9 ते 10
न्यूज एक्सचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 35 ते 45
डावे पक्ष – 13 ते 23
काँग्रेस – 00
सी व्होटरचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 24 ते 32
डावे पक्ष – 26 ते 34
काँग्रेस – 0 ते 2
………………………………………
नागालँड (एकूण जागा – 60)
न्यूज एक्सचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 27 ते 32
एनपीएफ – 20 ते 25
काँग्रेस – 0 ते 2
सी व्होटरचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 25 ते 31
एनपीएफ – 19 ते 25
काँग्रेस – 0 ते 4
…………………………..
मेघालय – एकूण जागा 60
एक्सीस माय इंडिया न्यूज 24 चा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 30
काँग्रेस – 20
पीडीएफ – 3
राष्ट्रवादी काँग्रेस – 2
इतर – 4
न्यूज एकसचा एक्झीट पोल
भाजप – 8 ते 12
काँग्रेस – 13 ते 17
एनपीपी – 23 ते 27
सी व्होटरचा एक्झीट पोल
भाजप – 4 ते 8
काँग्रेस – 13 ते 19
एनपीपी – 17 ते 23
COMMENTS