टाईम्स नाऊ या इंग्रजी वाहिनीने केलेल्या प्रीपोल सर्व्हेमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपला एकूण 182 जागांपैकी 111 तर काँग्रेसला 68 आणि इतरांना 3 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजप विरोधी वातावरण असलं तरी काँगसला त्याचा फायदा होताना दिसत नाही असं सर्व्हेमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात कांटे की टक्कर असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामध्ये भाजपला 95 तर काँग्रेसला 82 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तसंच दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळतील असाही अंदाज व्यक्त करण्यात आला होता. गुजरातमध्ये येत्या 9 आणि 14 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान होत आहे.
COMMENTS