पश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या ?  तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.

पश्चिम बंगालमध्ये भाजप का हरला, ममता का जिंकल्या ? तुम्हाला काही वेगळं वाटत असल्यास कमेंटमध्ये नक्की लिहा.

अब की बार 200 पार अशी गर्जना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. पण त्यांची ही गर्जना ममता बॅनर्जी यांनी पूर्ण करुन दाखवली आणि सलग दुस-यांदा पश्चिम बंगालच्या पीचवर डबल सेंचुरी मारली आहे. तर डबल सेंचुरीची गर्जना करणा-या अमित शहा आणि भाजपला सेंच्युरीही पूर्ण करता आली नाही. अशा निकालाची नेमकी कारणे काय आहेत ? भाजपने एवढी ताकद लावूनही त्यांना अपेक्षित यश का आलं नाही याचा आढावा घेऊ.
भाजपनं ममतांच्या गडाला सुरूंग लावताना ममता दिदी या मुस्लिम तुष्टीकरण करत आहेत. हिंदुत्वाच्या विरोधात आहेत असा प्रचार करत बंगालमध्ये आक्रमकपणे हिंदु मुस्लिम ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये असलेला संपूर्ण मुस्लिम समाज आपसुकच ममता बॅनर्जी यांच्याबाजुने एकवटला. बंगालमध्ये तब्बल 30 टक्के मुस्लिम मतदार आहेत. बंगालमध्ये एमआयएम आणि सेक्युलर फ्रंट आणि काँग्रेस यांना अत्यंत कमी मतदान झालेलं पहायला मिळत आहे. याचा मोठा फायदा ममता बॅनर्जी यांना झाला.
हिंदु मुस्लिम ध्रुवीकरणासोबतच भाजपनं फोडाफोडी करत ममता बॅनर्जी यांच्याकडील अनेक बजनदार नेत्यांना पक्षात घेतलं. टीएमसीतून जी मोठी नावं भाजपात आली ती भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गंभीर आरोपी असलेली नावं होती. काही ठिकाणी वैयक्तीक ही नावं जिंकली असली तरी अनेक ठिकाणी त्यांचा पराभव झाला. पण यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणा-या भाजपवरच हे प्रकरण बुमरँग झाल्याचं पहायला मिळतंय. गेल्यावेळी नंदीग्राममधून तब्बल 80 हजार मतांच्या आघाडीने विजयी झालेल्या शुभेंद्र अधिकारी या एकावेळच्या पक्षाच्या हेवीवेट नेत्याविरोधात मतमदांनी दंड थोपाटले. अधिकारी याच्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. 80 हजारांची लीड तोडत ममतांनी या मतदारसंघात 1200 पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नढ्ढा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्रमकपणे हल्ला चढवला. मात्र त्याचा फारसा फायदा त्यांना झाला नाही. उलट ममतांना त्याची सहानभुती मिळाली असंच म्हणावं लागेल. तसेच ममता बॅनर्जी यांनी त्याला स्थानिक आणि बाहेरचे असा रंग देत बंगाली प्राईड जागृत केलं त्याचाही फायदा ममता बॅनर्जी यांना झाला.
पंतप्रधानांनी कोरोनाकडे दुर्लक्ष करत प्रचारात गुंतवून घेतल्याचा आरोप भाजपवर झाला. शेतकरी विरोधी तीन कायदे त्याविरोधात विरोधकांनी हल्लाबोल केल्याचा फायदा ममतांना झाला. तसंच काँग्रेसनं या निवडणुकीत फारसं लक्ष दिलं नाही. डाव्यांनीही काही प्रमाणात ममतांना मदत केली अशी चर्चा आहे. त्यामुळेच नंदीग्रामधून डाव्यांनी मुस्लिम उमेदवार दिला नाही अशीही चर्चा आहे. या सा-या घटकांचा भाजपला तोटा झाल्याचं चित्र आहे.

COMMENTS