राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील आजचा दिवस महत्त्वाचा !

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील आजचा दिवस महत्त्वाचा !

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातील आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. सरकारतर्फे आज विधानसभेत मराठा आरक्षणाचा कायदा करण्यासाठी विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य मंत्रीमंडळच्या उपसमितीची बैठक आज सकाळी होत आहे. या बैठकीत विधेयकाच्या मसुद्याला अंतिम रुप देऊन ते विधानसभेत आणि नंतर विधानपरिषदेत मांडले जाईल. तत्पूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील एटीआर विधिमंडळात मांडला जाणार आहे. मराठा समाजाला किती टक्के आरक्षण द्यायचे याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत.

हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असल्याने सरकारला आजच मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मांडून ते मंजूर करून घ्यावे लागेल.
आज विधेयक मांडले गेले नाही, तर सरकार चर्चा टाळण्यासाठी शेवटच्या दिवशी विधेयक आणू शकते.
विधानसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत सरकारने एटीआर मांडणार असल्याचा उल्लेख आहे. मात्र विधेयक मांडण्याबाबत कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे सरकार मराठा आरक्षण विधेयक आयत्या वेळी मांडणार की ते उद्यावर जाणार याबाबत उत्सुकता आहे.

COMMENTS