आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

1 ) विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्त्यांना निधी उपलब्ध करण्यास मान्यता. यामुळे शेतरस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.

2) ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांतर्गत स्थापित केलेल्या ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अंमलबजावणी अधिकारात सुधारणा.

3) अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची 3 हेक्टर 33 आर जमीन साठवण तलाव व जलशुद्धीकरण केंद्रासाठी कोकमठाण ग्रामपंचायतीस हस्तांतरण करण्याचा निर्णय.

4) मुंबई महानगरपालिका अधिनियम-1988, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती आणि औद्योगिक नगरी अधिनियम-1965 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

5) महाराष्ट्र परिचारिका अधिनियम-1966 मध्ये सुधारणा करण्यास मान्यता.

COMMENTS