आणखी दोन मित्रपक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत ?

आणखी दोन मित्रपक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत ?

नवी दिल्ली – भाजपला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून बिहारमधील राजकीय हालचालीनुसार आणखी दोन मित्रपक्ष एनडीएतून बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण बिहार आणि उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीनंतर लोक जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा रामविलास पासवान आणि खासदार चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. पासवान आणि नितीश कुमार यांच्यात झालेल्या दिर्घकाळ भेटीमुळे बिहारमध्ये वेगळी निवडणूक लढवली जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दरम्यान जेडीयु आणि लोकजनशक्ती पार्टी हे दोन्ही मित्रपक्ष एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तसेच लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीतून हकालपट्टी करण्यात आलेले मुन्ना यादव यांनीही नितीश कुमार यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. मुन्ना यादव यांच्यासह बिहारमधील अनेक नेते नितीश कुमारांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जर या दोन्ही पक्षांनी एनडीएला रामराम ठोकला तर बिहारच्या राजकीय वातावरणात मोठे फेरबदल होणार असल्याचं दिसत असून बिहारमध्ये पुन्हा एकदा निवडणुका घेतल्या जाऊ शकतात अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS