देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द, इतिहासात पहिल्यांदाच मुंबईची लाईफलाईन बंद!

देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द, इतिहासात पहिल्यांदाच मुंबईची लाईफलाईन बंद!

नवी दिल्ली – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून 31 मार्चपर्यंत मुंबई लोकलसेवेसह देशभरातील सर्व रेल्वे सेवा रद्द करण्याचा नुर्णय सरकारनं घेतला आहे.येत्या 31 मार्चपर्यंत फक्त मालवाहतूक करणाऱ्या गाड्या सुरु राहातील, इतर सर्व प्रवासी गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेन बंद होणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाकडून सर्व लोकल ट्रेन, प्रिमिअम ट्रेन्स, मेल, एक्सप्रेस गाड्या, पॅसेंजर ट्रेन, कोकण रेल्वे, कोलकाता मेट्रो ट्रेन आज मध्यरात्री पासून बंद ठेवल्या जाणार आहेत. तसेच ज्या ट्रेन किंवा एक्सप्रेस या संध्याकाळी 4 पूर्वी निघाल्या असतील त्या ट्रेन सुरु राहणार आहेत. तर देशात इतर ठिकाणी गरजेच्या वस्तू ने-आण करण्यासाठी मालगाड्या मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसेच, ज्या प्रवाशांनी तिकिटांचे बुकिंग केले असेल त्यांना पूर्ण पैसे रिफंड करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जनता कर्फ्यूला जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली जाऊ शकते असं बोललं जात आहे.

COMMENTS