तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी !

तिहेरी तलाक विधेयकाला लोकसभेत मंजुरी !

नवी दिल्ली – तिहेरी तलाक विधेयकाला आज  लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयकासाठी आज लोकसभेत मतदान करण्यात आलं. यानंतर विधेयक मंजूर करण्यात आलं असून 250 खासदारांनी यासाठी मतदान केलं. यानंतर 238 विरुद्ध 12 मतांनी विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. मतदानाआधी काँग्रेसने सभात्याग करत या विधेयकाला आपला विरोध दर्शवला होता. हे विधेयक कोणत्याही समाज किंवा धर्माविरोधात नसून हे विधेयक महिलांचे अधिकार आणि त्यांच्या न्यायासाठी असल्याचं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत म्हटलं आहे.

दरम्यान हे अत्यंत महत्त्वाचे विधेयक असून यावर सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. हे विधेयक संविधानाशी संबंधित असून हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे. तसेच या विधेयकाचा थेट परिणाम ३० कोटी महिलांवर होणार असून त्यांचे रक्षणही महत्त्वाचे असल्याचं खरगे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS