गेली 25 वर्ष डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या त्रिपुरा यंदा कमळ फुलण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विविध पोल कंपन्यांनी केल्या सर्व्हेमध्ये त्रिपुरात भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार येण्याची शक्यात वर्तवण्यात आली आहे. तीन कंपन्यांनी त्रिपुराचा एक्झीट पोल केल्या असून तीनही सर्व्हेमध्ये भाजप आणि मित्र पक्षाला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. डाव्या पक्षांना हा मोठा धक्का असेल. पश्चिम बंगलाचा गड उद्धवस्त झाल्यानंतर कवेळ त्रिपुरा आणि केरळ ही दोनच राज्य डाव्यांच्या ताब्यात होती. त्यात आता त्रिपुराही गेल्यास केवळ केरळममध्ये डाव्यांची सत्ता राहिल.
नागालँडमध्येही दोन्हीही एक्झीट पोलमध्ये भाजप आणि मित्र पक्ष बहुमत मिळवतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर मेघालयामध्ये काँग्रेस आणि दिवंगत नेते पी ए संगमा यांच्या एनपीपी पक्षात जोरदार चुरस असून एनपीपी सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर त्रिपुरा आणि नागालँडमध्ये सत्तेपर्यंत पोचणा-या भाजपा दुहेरी आकडाही गाठता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला दोन जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तीनही राज्यांची मतमोजणी 3 मार्चला होणार आहे.
विविध एक्झीट पोलचे अंदाज
त्रिपुरा – एकूण जागा – 60
अक्सीस, माय इंडिया आणि न्यूज 24 चा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 45 ते 50
डावे पक्ष – 9 ते 10
न्यूज एक्सचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 35 ते 45
डावे पक्ष – 13 ते 23
काँग्रेस – 00
सी व्होटरचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 24 ते 32
डावे पक्ष – 26 ते 34
काँग्रेस – 0 ते 2
………………………………………
नागालँड (एकूण जागा – 60)
न्यूज एक्सचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 27 ते 32
एनपीएफ – 20 ते 25
काँग्रेस – 0 ते 2
सी व्होटरचा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 25 ते 31
एनपीएफ – 19 ते 25
काँग्रेस – 0 ते 4
…………………………..
मेघालय – एकूण जागा 60
एक्सीस माय इंडिया न्यूज 24 चा एक्झीट पोल
भाजप आघाडी – 30
काँग्रेस – 20
पीडीएफ – 3
राष्ट्रवादी काँग्रेस – 2
इतर – 4
न्यूज एकसचा एक्झीट पोल
भाजप – 8 ते 12
काँग्रेस – 13 ते 17
एनपीपी – 23 ते 27
सी व्होटरचा एक्झीट पोल
भाजप – 4 ते 8
काँग्रेस – 13 ते 19
एनपीपी – 17 ते 23
COMMENTS