नाशिक – नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरुन तुकाराम मुंढे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. मुढे यांची नियुक्ती नेमकी कुठे करण्यात आली याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमावस्था पहवायला मिळाली आहे. मुढे याची नियुक्ती उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी पदावर करण्यात आली असल्याची चर्चा सुरु होती. परंतु मुढे यांची मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचा आदेश मंत्रालयातून निघाला आहे. मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मंत्रालयातील नियोजन विभागाच्या सहसचिवपदी बदली करण्यात आली आहे.
दरम्यान नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच नाशिकचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांची स्वाक्षरी असलेलं पत्र तुकाराम मुंढेंना देण्यात आले आहे. मुंबईतील नियोजन विभागाचं सहसचिवपद रिक्त असल्याने तिथे मुंढे यांची वर्णी लावण्यात आली. यापूर्वी 2010 आणि 2012 मध्ये त्यांची बदली मुंबईत झाली होती.
मुंढे यांची १२ वर्षाच्या कार्यकाळात ११ वेळा बदली झाली आहे. अवघ्या नऊ महिन्यांमध्येच त्यांची बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंच्या बदलीची बातमी नाशिकमध्ये पसरताच नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सत्ताधारी भाजपाच्या विरोधात नाशिक महापालिकेसमोर मुंढेंच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत निषेध केला आहे.
COMMENTS