मुंबई – सर्व शिक्षा अभियानातील एका पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं लिखाणाचं प्रकरण परवा उघडकीस आलं. त्यानंतर आता संत तुकाराम महाराज यांच्या पत्नीची बदनामी करणार लिखाण असलेलं पुस्तक सर्वशिक्षा अभियानात असल्याचं पुढं आलं आहे. ”तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. ‘संतांचे जीवन प्रसंग’ गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
तुकाराम महाराजांची पत्नी शिव्या द्यायची, सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात उल्लेख
”तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या.
‘संतांचे जीवन प्रसंग’ गोपीनाथ तळवलकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
# pic.twitter.com/a2nRYM3g6O— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 12, 2018
याच सर्वशिक्षा अभियानातील एका पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं लिखाण केललं आहे. हे प्रकरण बाहेर आल्यानंतर संभाजी ब्रिगेडसह, अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी सरकारने माफी मागवी, हे पुस्तक मागे घ्यावे अशी मागणी केली आहे. पण सरकारकडून अजून कुठलीही प्रतिक्रया आलेली नाही. केवळ संभाजी महाराजांवर बदनाम कारक लिखाण करणा-या प्रकाशकांनी आणि लेखिका शुभा साठे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे. म्हणे हे नजरचुकीने झाले आहे.
एखादा शब्द नजरचुकीने लिहिला जाऊ शकतो. पण असे पॅरेग्राफ चे पॅरेग्राफ नजर चुकीने कसे काय लिहिले जाऊ शकतात ? नजरचुकीने झाले आहे हा युक्तीवाद कोणालातरी पटेल का ? मग तुकाराम महाराजांच्या लिखाणाबाबत काय ? एवढं घाणेरडं आणि चुकीचं लिखाण केलंच कसं जाऊ शकतं. त्याची निवड सर्वशिक्षा अभियानासाठी कशी केली जाऊ शकते ? दोन दिवस झाले प्रकरण समोर येत आहेत. सरकारकडून काहीही प्रतिक्रिया येत नाही. मग अश लिखाणाला सरकारची मूक संपती आहे असं समजायचं का ? असे प्रश्न पडतात. भाजपमध्ये कोणी शिवप्रेमी नाही का ? त्यांना असं लिखाण मान्य आहे का ? अशा लिखाणाचा त्यांना राग येत नाही का ?सरकारचं हे सर्वशिक्षा अभियान आहे की सर्व दैवतांची बदनामी करणारं अभियान आहे ? असे प्रश्न यानिमित्ताने पडत आहेत.
ही सर्व पुस्तके मागे घेण्यात यावीत तसंच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. बघूया सरकारला आता तरी जाग येते की नाही ?
COMMENTS