उस्मानाबाद – तुळजापूर विधानसभा मतदारसंघात समावेश असलेल्या उस्मानाबाद तालुक्यातील 72 गावांमध्ये आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. प्रतिपंढरपूर तेर नगरीतील संत गोरोबाकाका तीर्थक्षेत्राच्या विकासाबरोबर इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात विकासनिधी देऊन आमदार चव्हाण यांनी ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्याचे काम केलेले आहे. यापुढील काळातील विकासकामे करण्यासाठी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांना मतदारांनी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे नेते दौलतराव माने यांनी केले आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि.16) उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथे झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्षय लॅक्समन सरडे, डीसीसी बँकेचे माजी उपाध्यक्ष नारायण समुद्रे, नितीन बागल, औदुंबर सांगळे, नरसिंग हाजगुडे, हनुमंत हाजगुडे, पांडुरंग वाकुरे, दत्ता कसबे, अशोक मगर, धर्माजी पाटील आदींची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भाषणात आमदार मधुकरराव चव्हाण यांनी मंत्रीपदी असताना तसेच सत्ता नसताना देखील मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून विकासकामे केल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला. सभेस रामवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS