तुळजापूर – प्रहार क्रांती संघटनेचे उमेदवार महेंद्र धुरगुडे यांचा मतदारांच्या गाठीभेटीवर भर!

तुळजापूर – प्रहार क्रांती संघटनेचे उमेदवार महेंद्र धुरगुडे यांचा मतदारांच्या गाठीभेटीवर भर!

उस्मानाबाद – तुळजापूर मतदारसंघात सर्व उमेदवार मातब्बर असल्याने येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रहार क्रांती संघटनेकडून महेंद्र धुरगुडे त्यांनी मतदारांच्या गाठीभेटीचा सपाटा सुरू केला आहे. प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या सभा झाल्या असल्या तरी प्रादेशिक पक्षांच्या सभा होताना दिसत नाहीत. त्यामुळे धुरगुडे यांनी प्रत्यक्ष गाठीभेटीला प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये धुरगुडे यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. आणि त्यामध्ये त्यांना यशही आले. शिवाय शेतकऱ्यांना विविध प्रकारची अवजारे, खते, बियाणे अल्पदरात उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

त्यामुळे मोठ्या सभेच्याऐवजी ते मतदारांच्या भेटीस प्राधान्य देत आहेत. बाजारच्या दिवशी थेट शेतमाल विक्रेत्यांना भेटून आपली भूमिका मांडत आहेत. आता त्यांची शिलाई मशीन एक-एक मतदार जोडत कुठपर्यंत पोहचणार याकडे या मतदारसंघातील मतदारांचे लक्ष लागले आहे. दोन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राणा पाटील या मतदारसंघात रिंगणात आहेत. शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून अशोक जगदाळेही भवितव्य आजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या मतदारांच्या लढाईत धुरगुडे यांची शिलाई मशीन किती माणसे जोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS