तुळजापूर – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या गॅसवर कोणाची डाळ शिजणार? की ते स्वतः बाजी मारणार !

तुळजापूर – वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या गॅसवर कोणाची डाळ शिजणार? की ते स्वतः बाजी मारणार !

उस्मानाबाद – तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेसचे उमेदवार मधुकरराव चव्हाण सलग पाचव्यांदा रिंगणात उतरले आहेत. तर त्यांना टक्कर देण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपच्या माध्यमातून कंबर कसली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांनीही आपल्या गॅससिलेंडर मधून प्रतिस्पर्ध्यांना चटके द्यायला सुरुवात केली आहे. सहा महिन्यापासून त्यांनी संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांचे जाळे तयार केली आहे.

राणाजगजितसिंह पाटील

मतदारसंघातील नागरिकांना ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवत स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय नळदुर्ग नगरपालिकेत त्यांचे वर्चस्व आहे. मुस्लिम तसेच दलित मतदारही मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहेत. ही मते जगदाळे यांच्या पारड्यात जातील. शिवाय त्यांच्या यापूर्वीच्या कामामुळे त्यांना नालदुर्गमध्ये मतदान मिळू शकते. त्यामुळे मतदारसंघातील अन्य उमेदवार मधुकरराव चव्‍हाण यांना यांचा किती फटका बसणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. असे असले तरी आमदार चव्हाण यांचा मतदार वेगळा आहे.

मधुकरराव चव्‍हाण

अन्य मतदार स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न इतर उमेदवाराकडून केला जात आहे. परिणामी भाजपचे राणा पाटील यांनाही याचा फटका बसू शकतो. प्रहार संघटनेचे महेंद्र धुरगुडे यांनीही एक एक मतदार शिलाई मशीनच्या माध्यमातून जोडत आहेत. त्यामुळे जगदाळे यांच्या गॅसने त्यांचे धागे तुटनार का? जगदाळे यांच्या गॅसवर कुणाची डाळ शिजणार? की जगदाळे स्वतः बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

COMMENTS