दूध दरवाढीबाबात राज्य सरकारचा मोठा निर्णय !

दूध दरवाढीबाबात राज्य सरकारचा मोठा निर्णय !

नागपूर – दूध दरवाढीबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला असून दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 21 जुलैपासून हा निर्णय लागू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून दूध संघांना यापुढे शेतक-यांना 25 रुपये भाव द्यावा लागणार आहे. राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देणार असून दूध संघांकडून ते पाच रुपये शेतक-यांना देणं बंधनकारक असणार आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेस नेते दिलीप वळसे-पाटील यांच्यासह दूध संघाचे नेते उपस्थित होते. दरम्यान राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राजू शेट्टी यांचं सुरु असलेलं आंदोलन मागे घेतलं जाणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS