मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन आमदारांचे राजीनामे !

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन आमदारांचे राजीनामे !

मुंबई – राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत असून  राज्यभरात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. अशातच याच मागणीवरुन कन्नडमधील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे औरंगाबादमधील वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत तात्काळ निर्णय घेतला नाही तर आपण राजीनामा देणार असल्याचं कालच हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलं होतं. त्याबाबत पहिली बातमी महापॉटिक्सनं दिली होती. त्यानंतर आज हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाला समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी देखील राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. वैजापुरात आरक्षणासाठी आंदोलन सुरू असून याच ठिकाणी चिकटगावकर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे. या दोन्ही आमदारांनी केलेल्या राजीनाम्यांच्या घोषणेमुळे राज्यातील वातावरण आणखी चिघळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अडचणीत आणखी वाढ झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS