‘हे’ दोन दिग्गज खेळाडू क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकीय मैदानात, लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट ?

‘हे’ दोन दिग्गज खेळाडू क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकीय मैदानात, लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट ?

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकण्यासाठी निकराचे प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या निवडणुकीच्या प्रचार काही स्टार मंडळी करणार असल्याची माहिती आली होती. यामध्ये खेळाडू, अभिनेते, अभिनेत्रींचा समावेश आहे. परंतू अशातच आता भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज खेळाडू क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकीय मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. संडे गार्डिअनने याबाबतची बातमी दिली आहे.

भारतीय क्रिकेटमधील महेंद्रसिंह धोनी आणि गौतम गंभीर या दोघांना आगामी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप तिकीट देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका अहवालातून ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आगामी निवडणूक जिंकण्यासाठी आता भाजपकडून नवा खेळ खेळला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

COMMENTS