मुंबई – म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंताना धमकीचे पत्र आलं आहे. याबाबत सामंत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी पोलीस महासंचालकांना आपल्याला सुरक्षा पोहचविण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. याबाबत सामंत यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे.
दरम्यान काही महिन्यापूर्वीच सामंत यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर त्यांनी काही दलालांविरोधात कारवाई केली होती. तसेच म्हाडाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. काही विकासकांनी जनसमान्यांची फसवणूक केली असून मी त्यांच्यावर कारवाई केली आहे. परंतु अशातच अशा दलालांकडून मला धमकी दिली जात आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं असून त्यांनी सुरक्षा पुरविण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु मला अजूनपर्यंत सुरक्षा पुरविण्यात आली नाही. त्यामुळे माझ्या जिविताचे काही बरेवाईट झाले तर याला पोलीस यंत्रणा जबाबदार असेल असं सामंत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS