यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटींची मदत, मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद ! VIDEO

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटींची मदत, मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद ! VIDEO

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत आहे. या जागतिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी आपले योगदान म्हणून सर्व विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून 10 कोटी रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्याचे निश्चित केले आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच उर्वरित विद्यापीठांकडून देखिल आपत्कालीन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी मदत म्हणून जाहीर केली जाईल असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

COMMENTS