काय व्हायचं ते होऊद्या मी खासदारकीचा राजीनामा देतो – उदयनराजे भोसले

काय व्हायचं ते होऊद्या मी खासदारकीचा राजीनामा देतो – उदयनराजे भोसले

सातारा – काही दिवसांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीत अनेक मतदारसंघातल्या मतांमध्ये फरक असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे साताय्राचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काय व्हायचं ते होऊद्या मी खासदारकीचा राजीनामा देतो, सातारा लोकसभा मतदारसंघातली फेरनिवडणूक निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी फेसबुक पोस्ट लिहून उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

दरम्यान निवडणूक आयोगाच्या साईटवरील माहितीतही तफावत असल्याचे स्पष्ट झाल्यावर ती माहितीच काढून टाकण्यात आली. व्हायरसमुळे माहिती गेली असे आयोग म्हणतो. मग, लोकसभेत किती व्हायरस शिरलेत हे कोण सांगणार? असा प्रश्नही उदयनराजेंनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाला जर ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम वाटत असतील तर त्यांनी झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा करावा अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.तसेच मानवनिर्मित गोष्ट बनविणाऱ्याला त्यातील त्रुटी माहित असतात, त्यामध्ये कसे बदल करायचे हे माहित असते. अगदी कायद्यातही किती पळवाटा आहेत असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे

COMMENTS