मुंबई : भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा सुरु होती. यावेळी उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर पाच प्रमुख प्रश्न उपस्थित केल्याचे समजते. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल.
उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. जर एसईबीसी उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारलं तर सर्वोच्च न्यायालयातील केसवर काही परिणाम होणार आहे का? जर मोठ्या प्रमाणावर ईडब्यूएस आरक्षण स्वीकारलं तर त्याचा या केसवर काही परिणाम होणार आहे का ? ईडब्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल तर त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का ? महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ कमिटीने सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबधी जे काही निर्णय घेतले आहेत. ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन खटल्यात सरकारकडून वकिलांना नेमके काय निर्देश दिले गेले आहेत याचा खुलासा होईल. MPSC च्या माध्यमातून निवड झालेल्या 2150 उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही?
COMMENTS