खासदार उदयनराजेंचा संभाजी भिडेंना पाठिंबा !

खासदार उदयनराजेंचा संभाजी भिडेंना पाठिंबा !

सातारा –  कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शिव प्रतिष्ठानच्या संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी दलित संघटनांकडून केली जात आहे. परंतु भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे दोघांचा या घटनेशी काहीही संबध नसून त्यांच्याविरोधात बोलायची कोणाची लायकी नसल्याचं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.भिडे गुरुजींशी याबाबत मी फोनवरुन चर्चा केली असून या प्रकरणाबाबत बोलत असताना त्यांना रडूच आले असल्याचंही उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसचे या प्रकरणाचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचंही भिडे गुरुजी यांनी म्हटलं असल्याचं उदयनराजेंनी यांनी म्हटलं आहे.

‘भिडे गुरुजी हे वडीलधारी व्यक्ती असून त्यांच्याबद्दल मला आदर आहे. कोरेगाव भीमा येथे जे घडलं त्याच्याशी त्यांचा काही संबंध नाही आणि जे त्यांच्याविरुद्ध बोलताहेत त्यांची त्यांना बोलायची लायकी नाही’, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. तसेच मी कधीही जात-पात मानत नाही. काही राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी जात-पात निर्माण केली आहे. आता निवडणुका आल्यानं हे सगळं सुरू झालं असल्याचंही उदयनराजे म्हणाले आहेत.

 

COMMENTS