पुणे – सातारचे खासदार उदयनराजे भोसले आज शरद पवारांची पुण्यात भेट घेणार असल्याची माहिती आहे. उदयनराजे यांनी भाजप नेतृत्वाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भाजप प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. अशातच ते आता पवारांची भेट घेणार आहेत. यावरुन उदयनराजे आता राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं दिसत आहे. उदयनराजे भाजपात जाणार असल्याच्या चर्चेनंतर पवारांसोबतची ही पहिलीच भेट असणार आहे.
दरम्यान उदयनराजे यांनी पक्ष सोडू नये म्हणून राष्ट्रवादीने मनधरणी केली होती. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यासह काही नेत्यांनी त्यांची भेटही घेतली होती. तसेच
काही दिवसांपूर्वी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपण भाजपात येत नसल्याचेही स्पष्ट केले होते अशी माहिती आहे. त्यानंतर आता ते पवारांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS