खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार ?

खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार ?

कऱ्हाड – साता-याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यत वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची आज क-हाड येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली आहे. यावेळी चंद्रकांतदादांनी राजे कुणाला भीत नाहीत, सर्वांना खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमासाठी येथील शासकीय विश्रामगृहात काल रात्री मुक्कामी आले होते. आज सकाळी-सकाळीच खासदार भोसले यांनी येथील शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेवुन चर्चा केली. यावेळी राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मीणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुनिल काटकर, मनोज घोरपडे उपस्थित होते.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादीकडून अजूनही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं नाही. तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी देखील उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले हे आगामी लोकसभा निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार हे अजून तरी निश्चित झालं नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असल्याचं दिसत आहे.

 

 

COMMENTS