माझ्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक राज्यात कुठेही लावू  नका, उदयनराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन!

माझ्या वाढदिवसाचे शुभेच्छा फलक राज्यात कुठेही लावू नका, उदयनराजेंचं कार्यकर्त्यांना आवाहन!

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. 24 फेब्रुवारी) होणारा आपला वाढदिवस साजरा  करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वाढदिवसांचे शुभेच्छा फलक सातारा जिल्ह्यात नव्हे, तर महाराष्ट्रात कोठेही लावू नयेत, तसेच हार- पुष्पगुच्छ इत्यादी भेट देऊ नये, असे आवाहन त्यांनी केलं आहे.

याबाबत उदयनराजे यांनी पत्रक काढलं आहे. पुलवामा हल्ल्यामुळे 44 पेक्षा जास्त जवान हुतात्मा झाले आहेत. संपूर्ण देशाने, हुतात्मा जवानांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. जवानांच्या दुःखात सहभागी होता यावे, या भावनेतून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं उदयनराजेंनी म्हटले आहे.

COMMENTS